मसदे तिठा येथे ८, ९ सप्टेंबर रोजी बांधकाम कामगार नोंदणी तसेच आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन
आ. वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आयोजन
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मसदे तिठा येथे शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी व शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी केली जाणार आहे. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी आधारकार्ड नोंदणी तसेच आधारकार्ड दुरुस्ती अथवा अपडेट शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वडाचापाट शाखेतर्फे राबविल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार नोंदणी व आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वडाचापाट शिवसेना शाखाप्रमुख दिलीप पालव, श्रीकृष्ण पाटकर व अनंत पाटकर यांनी केले आहे.
शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी आयोजित बांधकाम कामगार नोंदणी करिता खालील नमूद कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. (सर्व कागदपत्र ओरिजनल लागतील)
१) फोटो
२) आधार कार्ड
३) बँक पासबुक
४) रेशन कार्ड
५) ग्रामसेवक दाखला
६) कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) मतदान कार्ड
2) पनकार्ड
3) पासपोर्ट
4) शाळा सोडल्याचा दाखला
5) सर्व्हिस ओळखपत्र शासकीय
6) ड्रायव्हिंग लायसन्स
7) पासबुक
8) शाळा ओळखपत
(यापैकी कोणताही एक)
पत्ता पुरावा
1) मतदान कार्ड
2) बँक पासबुक
3) लाईटबिल …( 3 महिन्याच्या आत)
4) इन्शुरन्स पॉलिसी
5) ड्रायव्हिंग लायसन्स
6) पासपोर्ट फोटो
7) पाण्याचे बिल (3 महिन्याच्या आत) (यापैकी कोणताही एक )
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा
१) अनंत पाटकर – 9011995503
२) दिलीप पालव – 9420425879