महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी मालवणात सायबर क्राईम मार्गदर्शन शिबीर

१८०० हून अधिक व्याख्याने देणारे चंद्रशेखर ठाकूर करणार मार्गदर्शन ; जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे माजी आ. परशुराम उपरकर यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये डिजिटल आर्थिक व्यवहार साक्षरता आणि सावधानता या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. स्तंभलेखन आणि टीव्हीवरील कार्यक्रमातून १८०० हून अधिक व्याख्याने देणारे चंद्रशेखर ठाकूर यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जगभरातील इंटरनेट सेवेमुळे जनतेला फसवणूक करणारे मॅसेज, बनावट फोन कॉल / ई-मेल, ऑनलाईन आर्थिक व्यवहारातील फसवणूक, ATM व DEBIT कार्डद्वारे होणारी फसवणूक यापासून आपण स्वतःला सुरक्षित कसे राखू शकतो…? या विविध विषयांवर स्लाईड शो द्वारे सोप्या शब्दांत आणि विनोदी शैलीत चंद्रशेखर ठाकूर यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. याचा लाभ नवतरूण तरूणी आणि वृद्ध मंडळी, महिला व सर्व नागरिकांनी घ्यावा आणि आपली आर्थिक फसवणूक होऊ नये याची दक्षता घ्यावी. असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!