दांडी येथील “त्या” दोन मच्छिमारांचा मालवण पोलीस निरीक्षकांच्या हस्ते सत्कार

मालवण : काही दिवसांपूर्वी निवती दीपगृहासमोर २५ वाव खोल समुद्रात बंद पडलेली मासेमारी नौका आणि त्यातील तिघा मच्छीमारांना सुखरूप दांडी समुद्रकिनारी सुखरुप आणल्याबद्दल रामचंद्र पराडकर उर्फ बाबु तारी आणि बाबी तारी या दोघा मच्छीमारांचा मालवण पोलिसांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी तारी बंधुंचे कौतुक केले. कोल्हे म्हणाले, शासकीय विभागांच्या गस्ती नौका सध्या कार्यरत नाहीत. त्यादिवशी समुद्रातील वातावरणही खराब होते. अशा परिस्थितीत तारी बंधु देवदुताप्रमाणे मदतीसाठी धावून आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!