भाजपा नेते दत्ता सामंत यांचा तेंडोलीत काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाला धक्का !

माजी खा. निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन शेकडो युवकांचा भाजपात प्रवेश

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी कुडाळ तालुक्यातील तेंडोलीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. तेंडोली येथे शुक्रवारी सायंकाळी उशिरा आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार व कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेऊन युवक काँग्रेस कुडाळ तालूका माजी उपाध्यक्ष रामचंद्र राऊळ यांच्यासह अनेक काँग्रेस तसेच उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

प्रवेशकर्त्याचे स्वागत प्रदेश सदस्य दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले. यावेळी प्रदेश सदस्य बंडया सावंत, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जेष्ठ नेते राजू राऊळ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे व पप्या तवटे, जेष्ठ भाजपा नेते का. स. नाईक गुरुजी, माजी सरपंच मंगेश प्रभू, माजी पं. स. सदस्य सौ. माधवी प्रभू, ग्रा. प. सदस्य बाबू राऊळ, विष्णू तेंडोलकर, बाळा जांभवडेकर, राम बांदेलकर, तन्मय वालावलकर तसेच इतर पदाधिकारी व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या विभागात भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत करून यापुढील सर्व निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!