निलेश राणेंची आश्वासनपूर्ती ; तुळसुली तर्फ माणगाव येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर येथे सोलर हायमास्ट मंजूर
तुळसुली तर्फ माणगाव उपसरपंच विजय वारंग यांच्या भाजपा प्रवेशावेळी दिले होते आश्वासन
कुडाळ : भाजपा नेते निलेश राणे यांनी काही महिन्यांपूर्वी तुळसुली तर्फ माणगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच विजय वारंग यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता. यावेळी तुळसुली गावात निलेश राणे यांनी गावातील विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रवेशावेळी विजय वारंग यांनी सर्वात प्रथम तुळसुली गावचे ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर मंदिर येथे हायमास्ट उभारणी करून देण्याची मागणी करत इतरही विकास कामांची यादी निलेश राणे यांच्याजवळ सुपूर्द केली होती. त्यावेळी निलेश राणे यांनी तुळसुली श्री. देव लिंगेश्वर मंदिर परिसरात लवकरात लवकर हायमास्ट बसवून देण्याचे आश्वासन दिले होते. आज केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून तुळसुली तर्फ माणगाव श्री देव लिंगेश्वर मंदिर येथे हायमास्ट उभारणी साठी निधी मंजूर केला आहे. गेली अनेक तुळसुली लिंगेश्वर मंदिर येथे वर्षे या हायमास्टसाठी मागणी होत असून शिवसेना नेत्यांनी तीन वर्षापूर्वी आश्वासन देऊनही या ठिकाणी हायमास्ट उभारणी केली नाही. मात्र निलेश राणे यांनी आपला शब्द पूर्ण केला अशी भावना श्री. वारंग यांनी व्यक्त केली आहे.