नाभिक व्यवसायात परप्रांतियांचा शिरकाव ; नाभिक संघटना कठोर भूमिका घेणार…

मालवण येथील बैठकीत इशारा ; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधणार

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सलून व्यवसायामध्ये परप्रांतीय कामगार वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे कुठेतरी थांबवण्यासाठी जिल्हा नाभिक संघटने मार्फत कठोर भूमिका घेण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी मालवण येथील भैरवी मंदिर येथे आयोजित बैठकीत दिला आहे.

नाभिक समाज संघटनेची बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीत सलून व्यवसायात होणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या शिरकावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. आजकाल परप्रांतीय सलून कारागीर पूर्ण जिल्हाभर झाले आहेत. त्यामुळे पारंपारिक कौशल्याला आळा बसला आहे. समाज बांधव या विषयामुळे त्रस्त बनले आहेत. त्यामुळे अशांना एक महिन्याची मुदत देऊन समज द्यावी. आमच्या समाजावर जो अन्याय होत आहे, लवकरच या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी राज्याचे राज्य संघटक विजय चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, जिल्हा सचिव जगदीश चव्हाण, युवा जिल्हा कार्याध्यक्ष शुभम लाड, मालवण तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा सौ. दिपाली शिंदे, युवा मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड, माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, ज्येष्ठ सल्लागार बा. स. लाड, मालवण शहर अध्यक्ष अंकुश चव्हाण, तसेच नाभिक समाजातील इतर सलून व्यावसायिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!