देवबाग येथे २६ ऑगस्टला महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा

शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी, युवतीसेना आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी, युवतीसेना आणि तालुकाप्रमुख तथा स्थानिक माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर संयुक्त विद्यमाने शनिवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सिद्धिविनायक बीच होम स्टे, देवबाग येथे महिलांसाठी खास नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३००० रुपये, द्वितीय पारितोषिक २००० रुपये, तृतीय पारितोषिक १००० रुपये देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी युवतीसेना उपतालुका अधिकारी सौ. हिना कांदळगांवकर 7045256422, दर्पणा केळुसकर 8265004095 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!