खादी ग्रामोद्योग कर्ज प्रकरणांची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर द्या

आ. वैभव नाईक यांची मागणी ; खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांची कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील खादी भवन येथे भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी खादी ग्रामोद्योग अंतर्गत विविध बँकांकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणांतील प्रलंबित सबसिडीची रक्कम लाभार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. नियमितपणे कर्जाची परतफेड करून देखील सबसिडी मिळाली नाही.त्यामुळे नागरिकांना नवीन कर्ज प्रकरणे करता येत नाहीत त्याचबरोबर बँक देखील एनओसी देत नाहीत. याकडे आ. वैभव नाईक यांनी रविंद्र साठे यांचे लक्ष वेधत कर्ज प्रकरणाची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी अशी विनंती केली. त्यावर रविंद्र साठे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर जमा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!