सामाजिक बांधिलकी ; “त्यांनी” स्वखर्चाने केली रस्त्याची दुरुस्ती…
प्रीतम गावडे, विनोद सांडव, नाना आंबेरकर यांच्या सामाजिक कार्याचे होतेय कौतुक
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील चौके – देवली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असताना या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने चौके येथील युवा उद्योजक तथा महाराष्ट्र सैनिक प्रीतम गावडे, मनसेचे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव आणि व्यवसायिक नाना आंबेरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चातून या रस्त्याची डागडुजी करून घेतली. त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे.
चौके देवली रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याची झालेली दुर्दशा आणि प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष याने नागरिक हैराण झाले होते. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र बांधकाम विभागाकडून याला मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी चौके येतील युवा उद्योजक व महाराष्ट्र सैनिक प्रितम गावडे, व्यावसायिक माजी मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव व व्यावसायिक नाना आंबेरकर यांनी स्वखर्चाने या रस्त्याची डागडुजी केली. त्याबद्दल नागरिकांनी आभार मानले आहेत.