आ. वैभव नाईकांकडून भाजपा नेते निलेश राणेंच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या कामांना स्वतःचे लेबल लावण्याचा प्रयत्न !

कुणकवळेचे माजी सरपंच आनंद वराडकर यांची टीका ; दुर्गादेवी मंदिर सुशोभीकरण आणि मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निलेश राणेंचेच प्रयत्न

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपा नेते तथा कुडाळ मालवणचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांना स्वतःचे लेबल लावण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून होत असल्याचा आरोप कुणकवळे गावचे माजी सरपंच आनंद उर्फ पप्पू वराडकर यांनी केला आहे. कुणकवळे येथील दुर्गादेवी मंदिर सुशोभीकरण आणि मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी माजी खा. निलेश राणे यांनी पाठपुरावा केला. मात्र हे काम स्वतःच्या माध्यमातून मंजूर केल्याचे सांगत आ. नाईक यांच्याकडून दिशाभूल केली जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे कामासाठी १० लाख रु. व कुणकवळे दुर्गादेवी मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख निधी आपल्या माध्यमातून मंजूर केला असे सांगत आ. वैभव नाईक यांनी या कामांची भूमिपूजन केले. मंदिर कमिटी अध्यक्ष या नात्याने मी तिथे गेलो. मात्र याबाबत अधिक माहिती घेतली असता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला १५ लाख निधी माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून झाला हे स्पष्ट झाले. त्याबाबत शासन दरबारी असलेली निलेश राणे यांची पत्रही आपण पहिली. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांच्याच प्रयत्नतून कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण व रस्ता कामासाठी १५ लाख निधी मंजूर झाला हे स्पष्ट होत आहे, असे कुणकवळे माजी सरपंच तथा दुर्गादेवी मंदिर स्थानिक कमिटी अध्यक्ष आनंद वराडकर यांनी म्हटले आहे. राज्यात सत्ता भाजप युतीची आहे. या सरकारच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघात विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी गेल्या काही महिन्यात कोट्यावधींचा निधी आणला आहे. अधिकाधिक विकासनिधी मिळण्यासाठी सातत्याने निलेश राणे यांचा मंत्रालयात पाठपुरावा सुरू असतो. कुणकवळे येथील विकास कामांसाठी निधीही निलेश राणे यांच्याच पाठपुराव्यातून आला. त्यामुळे आ. वैभव नाईक यांनी याचे फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. असे त्यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!