पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी महिलेला ध्वजवंदनाचा मान…

जि. प. शाळा गुरामवाडी नं. २ यांची आदर्शवत कामगिरी

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मंगळवारी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मालवण तालुक्यातील जि. प. शाळा गुरामवाडी नंबर २ यांनी यावर्षी ध्वजारोहणाचा मान शाळेत बारा वर्ष शालेय पोषण आहार स्वयंपाकी म्हणून सेवा करणाऱ्या सौ. ममता (आशा ) सावंत यांना देत त्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. प्रशालेच्या या आदर्शवत कामागिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रशालेत सकाळी ७.३० वा. ध्वजवंदन पार पडल्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, घोषणा, वह्यावाटप, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी उपसरपंच यांची शुभेच्छा भेट झाली. तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून उपलब्ध झालेल्या वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तर लोकमान्य मल्टीपर्पज टीम कट्टा कडून खाऊ वाटप व उपक्रमास सदिच्छा भेट, कट्टा केफेकडून खाऊ वाटप, मुलांच्या वेशभूषा स्पर्धा, गीतगायन असे विविध कलादर्शन कार्यक्रम यावेळी संपन्न झाले. या कार्यक्रमाना पालक व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अंगणवाडी सेविका, मदतनीस व अंगणवाडीच्या मुलांचाही यावेळी सहभाग होता. मुख्याध्यापिका श्रीम. वेदिका दळवी यांनी सर्वांचे स्वागत केले. तर सुत्रसंचलन पदवीधर शिक्षक परमानंद वेंगुर्लेकर यांनी केले. शेवटी उपक्रमशील शिक्षिका श्रीम. नेहा गवाणकर यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!