राजा गावडे यांचा वाढदिवस भाजपा कार्यालयात साजरा

वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा नेते दत्ता सामंत यांच्याकडून पोईप मधील गरजू मुलीला उपचारासाठी आर्थिक मदत

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील चौके गावातील भाजपचे स्थानिक नेते, माजी सरपंच राजा गावडे यांचा वाढदिवस भाजपाच्या मालवण तालुका कार्यालयात भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा नेते दत्ता सामंत यांनी पोईप गावातील कु. लावण्या संदीप पोईपकर या गरजू मुलीला उपचारासाठी आर्थिक मदत सुपूर्द् केली. राजा गावडे यांच्याहस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली.

यावेळी भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, भाऊ सामंत, भाई मांजरेकर, संदीप शेलटकर, कमलाकर कोचरेकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!