माळगाव मिरवेलवाडी ग्रामस्थांना युवासेनेचा मदतीचा हात…

मालवण : मालवण तालुक्यातील माळगाव मिरवेलवाडी हा भाग डोंगराळ भागात असल्यामुळे येथील ग्रामस्थांना नेटवर्कची समस्या निर्माण होत होती. ही समस्या जाणून घेत युवासेनेने याठिकाणी वायफाय सेवा जोडण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. युवासेनेचे उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, विभागप्रमुख मसुरे राहूल सावंत, विभागप्रमुख पोईप गणेश नेरकर, पराग नार्वेकर, युवासेना शाखाप्रमुख व ग्रामपंच्यायात सदस्य नंदकिशोर कासले यांच्याद्वारे ही आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी मिरवेल ग्रामस्थांनी युवासेनेचे आभार मानले. यावेळी उपसरपंच माळगाव शशिकांत सरनाईक, दिगंबर करावडे, बाबू भोसले, गणेश जाधव, विघ्न राजेंद्र हडकर, हर्षद परब व मिरवेलवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!