महेश जावकर फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नगरपालिकेत होते का ?

पावसाळ्यात रस्त्याची कामे होत नाहीत, हे २५ वर्ष न. प. मध्ये वावरलेल्या जावकरांना माहीत नाही ? गणेश कुशे यांचा सवाल

पिंपळपार ते साधले तीठा रस्ता कामासाठी आ. वैभव नाईक आणि महेश जावकर सात वर्ष झोपले होते काय ?

मालवण | कुणाल मांजरेकर

पिंपळपार ते साधले तिठा हा रस्ता मंजूर असून, त्याची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. फक्त पावसाळ्यात रस्त्याची कामे करत नाहीत हे २५ वर्षे नगरपालिकेत वावरलेल्या महेश जावकर यांना माहीत नाही का ? की फक्त उदरनिर्वाहाचे साधनं म्हणून नगरपालिकेत होते ? रस्त्यासाठी आंदोलन अवश्य करा मात्र स्टंटबाजी करू नका. जनता हुशार आहे. तुमच्या २० वर्षाच्या कार्यकाळात झाली नाहीत ती कामे गेल्या ७ वर्षात झालीत. पाहिजे तर तुम्ही २० वर्षात केलेली कामा सांगा, मी ५ वर्षात केलेली कामे सांगतो. राजकारण आम्हालाही करता येतं, मात्र जनतेची दिशाभूल कराल तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे. असा सूचक इशारा माजी बांधकाम सभापती तथा मालवण शहर भाजप पदाधिकारी गणेश कुशे यांनी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांना दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात गणेश कुशे म्हणाले, मालवण शहरातील पिंपळपार ते साधले तिठा हा रस्ता गेली ७ वर्षे रस्ता झाला नाही. आता तो रस्ता आमदार वैभव नाईक यांच्यामुळे होतोय असं जर जावकर म्हणत असतील तर गेली ७ वर्षे आमदार वैभव नाईक आणि महेश जावकर झोपले होते का ? वैभव नाईकना रस्ता करायचाच होता तर सत्ता असताना का नाही केला ? असा सवालही गणेश कुशे यांनी उपस्थित केला आहे.

आता माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुाव्यामुळे शहरातील भाजपच्या लोकप्रतिनिधी मागणीवरून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शहरातील अनेक कामांना निधी दिला, म्हणून ही कामं होत आहेत. मात्र त्यांचं साधं नाव घेण्याचं औदार्य जावकर यांच्यात नाही. वर स्वतःच्या मागणी पाठपुराव्यातून झाले सांगत फुकटच्या फुशारक्या मारता. मंजूर कामांची भूमिपूजन करून जनतेला ती कामं आमच्यामुळे झाली असं भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करता, हे शोभते का ? असा सवाल गणेश कुशे यांनी केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!