बागायतसह बिळवस आणि माळगांव येथील बीएसएनएलच्या “अखंडित” सेवेसाठी युवासेनेचा मदतीचा हात…

मालवण | कुणाल मांजरेकर

खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बागायत टॉवर आणि त्याला जोडण्यात आलेल्या बिळवस आणि माळगांव येथील बीएसएनएलच्या टॉवर वरून ग्राहकांना अखंडित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी युवासेनेने मदतीचा हात दिला आहे.

बागायत टॉवर व त्याला जोडण्यात आलेले बिळवस, माळगाव येथील बीएसएनएल टॉवर गेले कित्येक दिवस लाईट गेल्यावर बंद होत होते. त्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत युवासेनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे येथे बॅटरीची व्यवस्था करण्यात आली आहे. युवासेना उपतालूकाप्रमुख अमित भोगले, विभागप्रमुख राहूल सावंत, शाखाप्रमुख किशोर कासले, मंगेश परब, भाई माधव, साईश खोत यांनी स्वखर्चाने व अंग मेहनतीने बीएसएनएलला सहकार्य करत सर्व बॅटरी काळसे, बागायत, हेदुळ येथे पोहोच केले. यावेळी मालवण बीएसएनएलचे अधिकारी कौडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!