दीपक पाटकर यांचा पुढाकार : देऊळवाडा येथील “तो” धोकादायक खड्डा बुजवला !

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथील भलमोठा खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजवण्यात आला आहे. या कामासाठी भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सा. बां. विभागाकडे पाठपुरावा केला होता.

मालवण – कसाल मुख्य महामार्गावर देऊळवाडा येथील महावितरण कार्यालयासमोर रस्त्याला पडलेला भलामोठा खड्डा वाहनचालकांना त्रासदायक ठरत होता. हा खड्डा बुजवण्यासाठी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेचे देखील लक्ष वेधत पाठपुरावा केला. अखेर सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा बुजवला. माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी भाऊ सामंत, भाई मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या कामासाठी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष कृष्णा ढोलम यांनीही पाठपुरावा केला, अशी माहिती दीपक पाटकर यांनी दिली. या कामा बद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3842

Leave a Reply

error: Content is protected !!