भाजपाच्या वतीने धुरीवाडा येथे ८ ऑगस्टला मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबीर
शहरातील वॉर्ड क्र. १ आणि २ च्या (धुरीवाडा, रेवतळे) लाभार्थ्यांना मिळणार लाभ
मालवण : भारतीय जनता पार्टी, मालवण यांच्या वतीने मंगळवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ यावेळेत धुरीवाडा येथे राजू बिडये यांच्या निवासस्थानी (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालया नजिक) मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील वॉर्ड क्र. १ आणि २ मधील लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ मिळणार आहे. तरी अधिक माहितीसाठी राजू बिडये 9422392628, वसंत गावकर 9860719734, ललित चव्हाण 9096728048, बाबू धुरी 9421144314 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महेश सारंग आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केले आहे.