मणिपूर मधील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणात उद्या होणाऱ्या मुकमोर्चाला मनसेचाही पाठींबा
मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल, मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड यांची माहिती
मालवण : मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणातील शांतताप्रेमी नागरिकांच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या निषेध मुकमोर्चास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असल्याची माहिती मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल आणि मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच महिलांच्या पाठीशी उभी राहत आली आहे. त्याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे वेळोवेळी सांगत आले आहेत कि बलात्कार किंवा महिलांशी वाईट वागणाऱ्यांविरोधात कडक पाऊले उचलणे गरजेचं आहे. अश्यांचे हातपाय कलम करायला हवेत. तरी ह्याच विचाराने उद्याच्या मोर्चाला मनसेकडून पाठींबा दर्शविला आहे. मनसेचे पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.