देऊळवाडा येथील हॉटेल महाराजामध्ये उद्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर यांच्या वतीने आयोजन

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे सलग सहावे शिबीर ; आतापर्यंत सुमारे ४०० जणांनी घेतला लाभ

मालवण | कुणाल मांजरेकर

येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पुढाकारातून तसेच सौरभ ताम्हणकर व माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर यांच्या वतीने देऊळवाडा पेट्रोलपंप नजिक हॉटेल महाराजा येथे उद्या गुरुवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत आयुष्मान भारत कार्ड मोफत काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेले हे सलग सहावे शिबीर आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या ५ शिबिराचा सुमारे ४०० नागरिकांनी लाभ घेतला आहे. तरी उद्याच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी 9423806158 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!