मालवणात शुक्रवार, शनिवारी मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिरे
माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. शिल्पा खोत, माजी महिला बालकल्याण सभापती सौ. दर्शना कासवकर, भाई कासवकर यांच्याकडून आयोजन ; वॉर्ड क्र. १,६ आणि ५ मधील नागरिकांना मिळणार लाभ
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. शिल्पा खोत, माजी महिला बालकल्याण सभापती सौ. दर्शना कासवकर, भाई कासवकर यांच्या वतीने ४ आणि ५ ऑगस्ट रोजी यतीन खोत यांच्या धुरीवाडा येथील अरुणोदय निवासस्थानी मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते ५ यावेळेत हे शिबीर होणार आहे. शुक्रवारी ४ ऑगस्टला वॉर्ड क्र. १ आणि ६ (धुरीवाडा, चिवला बीच, टोपीवाला हायस्कुल, कन्याशाळा परिसर) तर शनिवारी ५ ऑगस्टला वॉर्ड क्र. ५ ( भरड, रेवतळे आणि बांगीवाडा) याठिकाणच्या लाभार्थ्यांसाठी हे शिबीर होणार आहे. तरी अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी 8390103330, 9422584641, 9405497502 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी महिला बालकल्याण सभापती सौ. दर्शना कासवकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत आणि भाई कासवकर यांनी केले आहे.