Breaking : रस्त्यावर झाड कोसळून मालवण – कसाल राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प…

मालवण : मालवण – कसाल राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावरील साळेल ते चौके दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सिंधुदुर्गात सध्या सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे ठिक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साळेल ते चौके दरम्यान रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!