टेनिस क्रिकेट विश्व हादरलं : रोहित स्पोर्ट्स वेंगुर्लाचे संघमालक रोहित बोवलेकर यांचे निधन

सिंधुदुर्गसह गोव्याच्या टेनिस क्रिकेट विश्वावर शोककळा ; उद्या सकाळी मठ येथे अंत्यसंस्कार

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्याच्या टेनिस क्रिकेट विश्वाला हादरा बसला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील रोहित सुरेश बोवलेकर (वय- ३५) यांचे मंगळवारी २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास गोवा येथील व्हिजन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील अनेक मोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धा गाजवणाऱ्या रोहित स्पोर्ट्स वेंगुर्लाचे ते संघमालक होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. बुधवारी २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रोहित यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. बोवलेकर कॅशुचे मालक तथा महाराष्ट्र राज्य कॅशु असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांचे ते पुत्र होत. रोहित बोवलेकर यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्यांच्या मालकीच्या रोहित स्पोर्टस् संघाने लाखोंची बक्षिसे असणाऱ्या अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. रोहित स्पोर्ट्स क्लबमुळे अनेक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध झाले होते. त्यांच्या निधनाने टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना धक्का बसला असून टेनिस क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!