कट्टा येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यास वीज वितरण कर्मचाऱ्यांना युवासेनेचा मदतीचा हात ; पाणी समस्याही टळली….

नांदोसच्या जंगलात वाहिनीवर पडलेली फांदी केली दूर ; ठाकरे गट शिवसेना ग्रा. पं. सदस्य वंदेश ढोलम व युवासैनिकांचा पुढाकार

मालवण : मुसळधार पावसामुळे नांदोस येथे विद्युत वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे कट्टा गोकुळआळी परिसर व बाजारपेठेतील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे कट्टा गोकुळआळी व बाजारपेठ परिसरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणी उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत नांदोस येथे वीज वाहिनीवर पडलेली फांदी तोडून हटवण्यास मदत केल्याने येथील वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. परिणामी येथील पाणी समस्याही टळली आहे.

नांदोस येथे वीज वाहिनीवर फांदी पडल्याने विजेची समस्या निर्माण झाली होती. ही फांदी न हटवल्यास शनिवारी देखील वीज पुरवठा सुरु झाला नसता आणि पाण्याची समस्या निर्माण झाली असती. त्यामुळे याचा ग्रामस्थांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला असता. युवासेना कार्यकर्त्याना याची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य वंदेश ढोलम, समीर माळवदे, निखिल बांदेकर, किरण वाईरकर, उपेंद्र बोडये, सिद्धार्थ हिरवे, दर्शन म्हाडगुत यांनी त्याजागी जाऊन फांदी बाजूला करण्यास मदत केली. यावेळी वायरमन गणेश वारंग, मोहाळे व वायंगणकर यांनी युद्धपातळीवर रात्री ८ वाजेपर्यंत अतिशय कठीण भागात काळोखात काम केले. त्यामुळे वीज पुरवठा सुरु झाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!