नांगरभाट येथे घरावर माड पडून नुकसान ; मनसेच्या प्रीतम विलास गावडे यांचे स्वखर्चाने सेवाकार्य…

आपदग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत म्हणून ताडपत्री केली सुपूर्द ; अतिवृष्टीमुळे मदतीची गरज असल्यास हक्काने संपर्क साधण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील नांगरभाट जाधववाडी येथील सुनिता नामदेव जाधव यांच्या घरावर आज पहाटे माड पडून त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. याची माहिती मिळताच मनसेचे युवा नेते तथा युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी तातडीची गरज म्हणून स्वखर्चाने प्लास्टिक ताडपत्री देवून मदत केली.

यावेळी त्यांच्या समवेत उदय गावडे, प्रकाश सोनवडेकर, राहुल मोंडकर, लौकीक मेहतर, प्रतिक गावडे, ओमकार चव्हाण, रोहन तावडे, तथागत मालवणकर आदी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याना मदतीची आवश्यकता असल्यास 8605457204 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मालवण तालुका मनसे आणि प्रीतम गावडे मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!