Malvan Rain | भरपावसात सुदेश आचरेकर, दीपक पाटकर मदतीसाठी उतरले रस्त्यावर…

पावसाचे पाणी घुसलेल्या नागरिकांच्या घरी दिली भेट ; प्रशासनासह मदत कार्यात दिला सहभाग

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहराला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून पालिका प्रशासनासह मदत कार्यात सहभाग घेतला. तसेच नागरिकांच्या घरी भेट दिली. यावेळी युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, अरुण तोडणकर व अन्य नागरिक मदतकार्यात सहभागी झाले होते.

रेवतळे येथे मंडलिक कुटुंबीय तसेच लगतच्या अन्य काही कुटुंबीय यांच्या घरात पाणी घुसले. याबाबत नागरिकांनी संपर्क साधला असता सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, ललित चव्हाण त्याठिकाणी पोहचले. यावेळी विश्वास गावकर, अरुण तोडणकर व नागरिक त्या ठिकाणी होते. एका कॉम्लेक्स बाजूला मातीचा भराव असल्याने पाणी अडकून होते. जेसीबी मशीनच्या साहाय्याने माती बाजूला करत पाण्याचा मार्ग करण्यात आला. मात्र मंडलिक कुटुंबीय यांच्या घरात पाणी असल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था अन्य ठिकाणी करण्यात आली. मालवण बसस्थानक मार्ग परिसर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्या ठिकाणी व्यापारी व नागरिक यांच्या भेट घेऊन आचरेकर, पाटकर यांनी विचारपूस केली. आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासनास सूचना केल्या.

मालवण बाजारपेठ येथील करमळकर यांच्या घर दुकान येथे पाणी घुसले तसेच परिसरातील अन्य काही घरात पाणी घुसले त्याठिकाणी आचरेकर, पाटकर सहकारी यांनी भेट दिली. पाहणी करून प्रशासनास आवश्यक त्या सूचना दिल्या.

मालवण शहरात मुसळधार पावसाने जलमय स्थिती झाली त्याला काही ठिकाणी उभारलेली कॉम्लेक्स, बांधकाम कारणीभूत ठरली. तसेच प्रशासन स्तरावरून जलमय स्थितीत उपाययोजना व मदतकार्य करण्यास यंत्रणा नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी दिवाकर चव्हाण, दीपा मंडलिक, साई मंडलिक, जेम्स फर्नांडिस, मार्शल फर्नांडिस, संजय कुडाळे, विलास पुरोहित, महेश करमळकर, देवा गांवकर, दादा वाघ, संतोष गावकर व अन्य नागरिकही उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!