“एमआयटीएम” कॉलेजचा पॉलिटेक्निक तृतीय वर्षाचा निकाल जाहीर

सिव्हिल विभागातून रसिका सारंग, जास्मिन वेरघेसी आणि पूर्वा परब अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांच्या मानकरी

मॅकनिकल विभागातून दर्शन पालव, मनिष शिंदे आणि मंदार नाईक अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांचे मानकरी

मालवण : तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.

या परीक्षेत तृतीय वर्ष सिव्हिल विभागातील विद्यार्थी रसिका सारंग (84.21%) हिने प्रथम क्रमांक मिळवला असून जास्मिन वेरघेसी (79.84%) आणि पूर्वा परब (79.21%) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. मॅकनिकल विभागातून दर्शन पालव (77.59%) याने प्रथम क्रमांक मिळवला असून मनिष शिंदे (75.00%) तर मंदार नाईक (70.72%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना कॉलेजचे सिव्हिल विभागप्रमुख तथा एक्झाम डीन प्रा. विशाल कुशे, मॅकॅनिकल विभागप्रमुख प्रा. काजल सुतार तसेच सिव्हिल आणि मॅकॅनिकलचे प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सचिव नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम, प्राचार्य सूर्यकांत नवले, अकॅडमीक डीन पूनम कदम, ऍडमिनिस्टेटीव ऑफिसर राकेश पाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!