भाजपा नेते निलेश राणेंकडून चिंदर गावासाठी स्व-खर्चाने पॉवर टिलर उपलब्ध

भाजपा पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कडे केला सुपूर्द ; “त्या” शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

मालवण | कुणाल मांजरेकर

ऐन शेतीच्या हंगामात अज्ञात रोगाने चिंदर गावातील शेतकऱ्यांची गुरे मयत झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या शेतकऱ्यांना काल पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आर्थिक मदतीचा हात दिला होता. त्यानंतर आज निलेश राणे यांच्याकडून स्व खर्चाने येथील ग्रामपंचायतीला पॉवर टीलर देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने हा पॉवर टिलर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांनी हा पॉवर टिलर ग्रा. पं. कडे सुपूर्द केला.

चिंदर गावात अज्ञात रोगाने गुरे दगावली आहेत. या शेतकऱ्यांना भाजपा कडून सर्वतोपरी मदतीचा हात देण्यात आला आहे. काल पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली होती. ऐन हंगामात गुरे दगावल्याने शेतीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर उपलब्ध करून दिला आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांनी चिंदरचे प्रभारी सरपंच दीपक सुर्वे यांच्याकडे हा पॉवर टिलर सुपूर्द केला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, संतोष गावकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, मंगेश गावकर, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, दिगंबर जाधव, सचिन घागरे, राजा पाटणकर, विश्राम माळगांवकर, रणजीत दत्तदास, समिर अपराज, बाबा पडवळ आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!