मालवण शहरातील मॅकेनिकल रोड येथे साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा अखेर निचरा !

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची तत्परता ; पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही करत मोरी बसवून पाण्याचा मार्ग पूर्ववत

स्थानिक नागरिकांनी मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील मॅकेनिकल रोड मार्गावर गटार व पाणी प्रवाह वाहून नेणाऱ्या मोरीची पडझड झाल्याने पावसाचे पाणी साचून स्थानिक रहिवाशी आणि वाहंचालकांची तीव्र गैरसोय होत होती. सदरील बाब स्थानिकांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही करत मोरी बसवून मार्ग पूर्ववत केला आहे. सुदेश आचरेकर यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांनी आभार मानले आहेत.

मॅकेनिकल रोड मार्गावरील पाणी समस्येबाबत श्री. आचरेकर यांनी नगरपालिका बांधकाम अधिकारी सोनाली हळदणकर, राजा केरीपाळे यांचे लक्ष वेधत त्वरित कार्यवाहीची मागणी केली. त्यानुसार पालिका कर्मचारी मिथुन शिगले, कोकरे यांनी अन्य कर्मचारी यांच्या माध्यमातून शुक्रवारी कार्यवाही पूर्ण करत जाण्या येण्याचा मार्ग सुरळीत केला. यावेळी भूषण मेस्त्री, पिंटू मेस्त्री, गणेश कुडाळकर, विलास मुणगेकर, सदा चुरी, बबन मेस्त्री यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

स्थानिक नागरिकानी सुदेश आचरेकर तसेच दीपक पाटकर यांचे लक्ष वेधताच प्रशासन माध्यमातून तात्काळ कार्यवाही झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, लवकरच याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही केली जाणार आहे. नगरोत्थान निधीची तरतूद करण्यात आली असून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच पावसा नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तोपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!