भाजपा नेते निलेश राणेंचा कुडाळात झंझावात ; ग्रामीण भागातील जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत
कुडाळ : भारतीय जनता पक्ष, कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी आज कुडाळ तालुक्यात घरोघरी संपर्क अभियान अंतर्गत चेंदवण, पाट, माड्याचीवाडी, पिंगुळी येथील शक्तिकेंद्र प्रमुखांचा घरी भेट देऊन मोदी @9 अभियानाचा आढावा घेत सहभाग नोंदविला. या दौऱ्याला स्थानिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी निलेश राणे यांचे ठिक ठिकाणी स्वागत करून विकासाचे प्रश्न त्यांच्याकडे मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या, केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात मोदी @९ अभियान सुरू आहे. कुडाळ मालवण मतदारसंघात माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रभारी निलेश राणे यांनी संपर्क मोहिमेत आघाडी घेतली असून गेले कित्येक दिवस हे अभियान कुडाळ मालवण मतदारसंघात सुरू आहे. आज कुडाळ तालुक्यातील चेंदवन शक्तिकेंद्र प्रमुख नारायण शृंगारे, पाट शक्तिकेंद्र प्रमुख समाधान परब, तेंडोली शक्तिकेंद्र प्रमुख मंगेश प्रभू, पिंगुळी बूथ अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या निवासस्थानी जात शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या अखत्यारीत असलेल्या बूथ वरील मोदी @९ अभियानाचा आढावा घेतला. तसेच उपस्थित स्थानिकांच्या विकास कामांसंदर्भातील सूचना विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, माजी सभापती मोहन सावंत, वैभव चेंदवनकर, देवेंद्र नाईक, साधना परब, रश्मी नाईक, आरती पाटील, चंदन कांबळी, अवधूत सामंत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.