मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा स्थगित

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ तारखेचा रत्नागिरी दौरा स्थगित करण्यात आला आहे. सध्या राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मुंबई मेळाव्यानंतर त्यांचा हा दौरा होईल असे, मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांनी कळवलं आहे.

8 जुलै रोजी राज ठाकरे हे चिपळूण, खेड आणि दापोलीच्या दौऱ्यावर येणार होते. राज ठाकरे मुंबईमध्ये मेळावा घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करून मग चिपळूण, खेड आणि दापोली दौरा करतील व त्याची सुधारित तारीख आपणास कळविण्यात येईल असं वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!