काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट

मालवण : मालवण पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणून प्रवीण कोल्हे यांनी पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी व तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांची भेट घेत शाल, श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. या दरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, जिल्हा सरचिटणीस तथा विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवानंद लूडबे, पराग माणगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!