मुसळधार पावसात निलेश राणे पोहोचले शक्तीकेंद्र प्रमुखांच्या वाडी- वस्त्यांवर…
सरकार आपलंच आहे, तुम्ही संघटना मजबूत करा ; विकासासाठी भाजपा पक्ष संघटना आणि मी कटीबद्ध…
निलेश राणे यांचा शब्द ; नांदोस, वायंगवडे, गोळवण, माळगांव, वायंगणी, चिंदर, आचरा, पळसंब, श्रावण, किर्लोस, हिवाळे येथे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्षांशी साधला संवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
मोदी @ ९ अंतर्गत भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी दुसऱ्या टप्प्यात मालवण तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ अध्यक्षांच्या वाडी-वस्त्यांवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. मालवणला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र त्याची तमा न बाळगता निलेश राणे यांनी हा झंझावाती दौरा करीत नांदोस, वायंगवडे, गोळवण, माळगांव, वायंगणी, चिंदर, आचरा, पळसंब, श्रावण, किर्लोस, हिवाळे येथे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्षांशी संवाद साधला. केंद्रात आपलं सरकार आहेच. वर्षभरापूर्वी राज्यातही आपलंच सरकार आलंय. त्यामुळे आता विकासाची काळजी करू नका. भाजपा पक्ष संघटना आणि मी स्वतः तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत. तुम्ही गावागावात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या ९ वर्षात झालेला विकास जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करा, असे आवाहन निलेश राणे यांनी यावेळी केले. या दौऱ्याला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी सकाळी मालवण तालुक्यातील नांदोस येथून शक्ती केंद्र प्रमुख विजय निकम यांच्या निवासस्थानाकडून या दौऱ्याची सुरुवात केली. या दौऱ्यात भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी सभापती सुनील घाडीगावकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, संतोष कोदे, संतोष गावकर, राजेंद्र प्रभुदेसाई, दादा नाईक, महेंद्र चव्हाण, हरेश गावकर, नारायण लुडबे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदोस येथे विजय निकम, विद्याधर पार्टे, सदाशिव कारावडे, स्वप्नील गावडे, गौरव सावंत, नांदोस सरपंच माधुरी चव्हाण, सागर नांदोसकर, निलेश पेडणेकर, वैशाली घाडीगांवकर, तिरवडे येथील रेश्मा गावडे, उपसरपंच सुशील गावडे, जयेंद्रथ परब आदींनी येथील संघटनात्मक कामाची माहिती देऊन गावातील विकास कामांचे प्रश्न मांडले. सुकळवाडचे माजी उपसरपंच स्वप्नील गावडे यांनी गावातील विकास कामांचे प्रश्न मांडले.
वायंगवडे येथे सरपंच विशाखा सकपाळ, उपसरपंच विनायक परब, अरुण परब, बाळकृष्ण घाडीगावकर, ज्ञानेश्वर परब, विष्णू चव्हाण, श्रीकृष्ण परब, काशीराम परब, दीपक बागवे, सदाशिव परब आदींनी गावातील समस्या मांडत संघटनात्मक कामाची माहिती दिली. येथील टॉवरच्या समस्येबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
गोळवण गावात शक्तीप्रमुख विरेश पवार, उपसरपंच दादा गावडे यांच्याकडून निलेश राणे यांनी संघटनात्मक कामाची माहिती घेत मार्गदर्शन केले. यावेळी गावातील विकास कामांबाबत ग्रामस्थांनी समस्या मांडल्या. त्या दूर करण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिली. यावेळी बुथ अध्यक्ष शंकर गावडे, शरद माजरेकर, प्रकाश चिरमुले, महेश पालव, दया चव्हाण, सचिन पाताडे, पोईप सरपंच श्रीधर नाईक, ग्रामस्थ मनोज चव्हाण, विकास परब, मुरारी गावडे, संकेत धारपवार, संदेश पवार, निनाद धारपवार, संजय पाताडे, अभिमन्यू गावडे आदी उपस्थित होते.
माळगाव येथे शक्ती केंद्र प्रमुख निलेश खोत, बुथ अध्यक्ष आनंद शेलार, माजी सरपंच मेघश्याम परब, सुदर्शन परब, गुरुनाथ परब, विश्वनाथ भोगले, सुधीर परब, दिगंबर पळसंबकर, रामदास परब, राजन खोत, कुणकावळे सरपंच मंदार वराडकर, माळगाव सरपंच चैताली साळकर, ग्रामपंचायत सदस्य सुजल परब, माजी ग्रामपंचायत सदस्य निधी खोत, शुभांगी फणसेकर, सौ. जया कुणाल खोत आदी उपस्थित होते. यावेळी बागायत पुलाकडे साचणाऱ्या पाण्याबाबत ग्रामस्थांनी माहिती दिली असता निलेश राणे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आजच्या आज येथील साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढावा, अशी सूचना केली. यानंतर वायंगणी येथे शक्ती केंद्र प्रमुख दीपक सुर्वे, चिंदर येथे दत्ता वराडकर यांच्या निवासस्थानी निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी संघटनात्मक कामाबाबत चर्चा करण्यात आली.
आचरा येथे विविध विकास कामांबाबत चर्चा
मोदी @९ अभियान अंतर्गत निलेश राणे यांनी आचरा भागातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या भेटी घेतल्या. भर पावसातच निलेश राणे यांचा दौरा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविणारा ठरला. आचरा येथे अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरोघरी संपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देत समर्थन देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. तसेच ९ वर्षातील केलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी रामेश्वर विकास सोसायटीची जिल्हा बँकेकडून देण्यात येणारी वीस हजार कर्ज मर्यादा वाढवून पन्नास हजार करण्याची मागणी डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी केली. याबाबत निलेश राणे यांनी तत्काळ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत खास बाब म्हणून यात लक्ष देण्यास सांगितले. यावेळी राजन गांवकर, जेरान फर्नांडिस, संतोष कोदे, अरविंद सावंत, जयप्रकाश परुळेकर, बाबू कदम, वामन आचरेकर, लवू मालंडकर, शक्ती केंद्र प्रमुख अभिजित सावंत, मुझफ्फर मुजावर, संतोष मिराशी, अवधूत हळदणकर, सिद्धार्थ कोळगे, गांवकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर पळसंब, श्रावण, किर्लोस, हिवाळे येथेही निलेश राणे यांनी भेट देत स्थानिक पदाधिकारी अनंत राऊत, सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर यांच्याकडून विकास कामांचा आढावा घेत संघटना वाढीबाबत चर्चा केली. यावेळी महेंद्र चव्हाण, मकरंद राणे, प्रशांत परब, निलेश बाईत, राजेश तांबे, बाळू कुबल, अविनाश राऊत, सुशांत घाडीगांवकर, संतोष बाईत, अण्णा राऊत, शिवराम परब, प्रवीण घाडीगावकर, बाळा लाड, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, भास्कर लाड, दिलीप घाडीगावकर, कृष्णा घाडीगावकर, शशिकांत घाडीगावकर, देवेंद्र घाडीगावकर, रुपेश घाडीगावकर, अनिल घाडीगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.