भाजपा कडून कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघात ‘घरो घरी संपर्क’ अभियानाचा शुभारंभ

भाजपा नेते निलेश राणे यांची उपस्थिती ; सिंधुदुर्गनगरी येथून घरोघर फिरत पत्रके वाटत अभियानाचा शुभारंभ

सिंधुदुर्ग : गेल्या ९ वर्षांतील मोदी सरकारच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संपूर्ण देशात मोदी@९ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आज ‘घरो घरी संपर्क’ अभियानाचा शुभारंभ माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून करण्यात आला.

यावेळी निलेश राणे यांनी गेल्या ९ वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारकडून राबविब्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देणारे पत्रक घरोघर फिरून वितरित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा २०१४ ते २०२४ हा काळ भारतासाठी अमृतकाळ असून देश विकासाच्या अनेक योजना या काळात राबविण्यात आल्या व त्यांची प्रभावी अंमलबजावणी देशात सुरू आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचं आवाहन करत निलेश राणे यांनी माहिती पत्रक नागरिकांना सुपूर्द केली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, मालवण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, आनंद शिरवलकर, दीपक नारकर, पप्या तवटे, सुप्रिया वालावलकर, राजू परुळेकर, नागेश परब, आनंतराज पाटकर, राजेंद्र राणे, गौरव घाडीगांवकर, दीपक खरात, अवधूत सामंत तसेच कुडाळ मालवण मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!