कार्यसम्राट मा. नगरसेवक दीपक पाटकर यांची तत्परता ; वायंगणकर कुटुंबियांना मिळाला दिलासा
मालवण : तत्पर सेवाकार्यातून ‘कार्यसम्राट’ ओळख लाभलेले मालवण नगरपालिकेचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे तत्पर सेवाकार्य रेवतळे येथील वायंगणकर कुटुंबीयांनी पुन्हा एकदा अनुभवले आहे.
मालवण शहरातील रेवतळे (परुळेकर हॉस्पिटल नजीक) येथील वायंगणकर कुटुंबीय रहात असलेल्या परिसरातील एक माड वृक्ष अर्धवट तुटून घरावर धोकादायक स्थितीत राहिला. कोणत्याही संकटात नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असणारे दीपक पाटकर यांना या बाबत नागरिकांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. मोदी @9 अभियान अंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभेसाठी राजापूर येथे असलेल्या दीपक पाटकर यांनी माहिती मिळताच फोनद्वारे तात्काळ काही संपर्क केले. काही वेळातच बाबली आंब्रडकर, बाबू आंब्रडकर व सहकारी वायंगणकर यांच्या घरी पोहचले. अर्धवट तुटलेला माड सुरक्षितपणे तोडून खाली उतरला. यावेळी भाजप युवामोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, भाई मांजरेकर यांचेही सहकार्य लाभले. दीपक पाटकर व भाजप पदाधिकारी यांच्या माध्यमातून वायंगणकर कुटुंबियांना दिलासा मिळाला.
मालवणात नसतानाही एका फोन कॉलच्या माध्यमातून दीपक पाटकर यांनी दाखवलेल्या तत्परतेबाबत वायंगणकर कुटुंबीयांनी दीपक पाटकर व सर्वांचे आभार मानले. यापूर्वी वायंगणकर कुटुंबियांच्या घराच्या बाजूला आग लागली. तेव्हाही दीपक पाटकर यांनी तत्परता दाखवत सेवाकार्य केले होते. आता पुन्हा एकदा परिसरातील नागरिकांनी त्यांची तत्परता अनुभवली.