मोदींच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला सिंधुदुर्ग भाजपा पदाधिकाऱ्यांचा ऑनलाईन सहभाग
आ. नितेश राणे यांच्यासह प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचउपस्थिती
कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी “मेरा बूथ सबसे मजबूत” हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ऑनलाइन स्वरूपात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कणकवलीत प्रहार भवन येथे हे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे मोदी@९ अभियानाचे सहसंयोजक प्रमोद जठार, प्रदेश भाजपा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष राजन चीके, सरचिटणीस मनोज रावराणे, संदीप साटम, वैभववाडी नगराध्यक्ष माईंनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, प्राची तावडे, संजना सदडेकर, प्राची करपे, भाग्यलक्ष्मी साटम, सुरेश सावंत, अरविंद रावराणे, राजू म्हापसेकर, बाळ खडपे, भालचंद्र साठे, प्रकाश राणे, तालुका अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, नासिर काझी, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, श्री. साटम, रवी पालेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.