मनसेच्या मालवण मधील “राजगड” मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ

मनसेच्या कार्यालयातून जनतेला विश्वास वाटेल असे कार्य घडेल ; माजी आ. परशुराम उपरकर यांची ग्वाही

शहर विकासात मागील पाच वर्ष सत्ताधारी अपयशी ; सत्ता जाताच प्रशासनावर खापर फोडून स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न : उपरकरांचा हल्लाबोल

माजी आ. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत युवकांचा मनसेत प्रवेश

मालवण | कुणाल मांजरेकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या मालवण मधील “राजगड” या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सत्ताधारी पक्ष आज जनतेची कामे करायला विसरला आहे. आज अनेक ठिकाणी अधिकारी वर्ग मुजोर बनला आहे. त्यामुळे जनतेची सर्व कामे मनसेच्या कार्यालयातून होतील. हे कार्यालय केवळ निवडणुकी पुरतेच सुरु राहणार नाही, तर जनतेला विश्वास वाटेल असे कार्य मनसेच्या या कार्यालयाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास माजी आ. परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील बस स्थानकानजिक मनसेचे ‘राजगड” हे मध्यवर्ती कार्यालय बुधवार पासून सुरु करण्यात आले आहे. माजी आ. उपरकर यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, विशाल ओटवणेकर, रामनाथ पराडकर, संदीप लाड, प्रतिक कुबल, अमोल जंगले, प्रीतम गावडे, उदय गावडे, प्राजक्ता पार्टे, विवेक तोंडवळकर, नितीन खानोलकर, प्रशांत पराडकर आदी उपस्थित होते.

नगरपालिकेत सत्ताधारी अपयशी !

मागील पाच वर्षे शहर विकासात पालिकेतील सत्ताधारी पक्ष अपयशी ठरला आहे. शहराची त्यांनी वाट लावली आहे. मालवणची भुयारी गटार योजना अजूनही अपूर्ण आहे. शहर विकास आराखडा रद्द करण्याची ग्वाही देऊन सत्तेवर आलेले विकास आराखडा रद्द करण्यात अपयशी ठरले आहेत. आता सत्तेवर उतरल्यावर प्रशासनावर टोका केली जात आहे. सत्तेत राहून आपण काम करू शकलो नाही याची कबुली ते देत आहेत, अशी टीका परशुराम उपरकर यांनी शिवसेना ठाकरे गटावर केली.

यावेळी माजी आ. परशुराम उपरकर म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मालवण मधील राजगड या कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. सत्ताधारी पक्ष आज जनतेची कामे करायला विसरला आहे. ती कामे या कार्यालयातून होतील. काही ठिकाणी अधिकारी मुजोरी बनले आहेत. त्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल आणि जनतेला न्याय दिला जाईल. ज्या स्तरावर अडचण होईल तिकडे सहकारी म्हणून आपण मदत करू, असे सांगून आज जिल्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केले आहेत, असे ते म्हणाले. आज अनेक युवक मनसेकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे “नाका तेथे शाखा” उपक्रम मालवणात नक्की सुरु होईल, असा विश्वास उपरकर यांनी व्यक्त केला

युवकांचा मनसेत प्रवेश

मालवण शहर व तालुक्यातून असंख्य युवकांनी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत यावेळी मनसेत प्रवेश केला. यामध्ये मंगेश पुजारे,अक्षय परब,मनीष पूजारे अभिषेक परब, तुषार पुजारे, प्रसाद पुजारे, मंदार सावंत, प्रसाद परब, वरक,अथर्व गोलतकर, प्रणय साटम,अभिषेक साईल, प्रणय वायंगणकर, प्रशांत वायंगणकर, तुषार जुवेकर, अविनाश आचरेकर, सुरज मांजरेकर, महादेव धुरत,सिद्धेश घोगळे, सिद्धेश परब ,कुनाल माळवदे, विघ्नेश शिरोडकर, सुरज मांजरेकर, तेजस खोबरेकर, स्वर पेंडुरकर,चिन्मय कांबळी, कल्पेश मसुरकर, लुईस फर्नांडिस , सिद्धेश वायंगणकर,कुणाल मालवणकर आदींचा समावेश आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!