Breaking : कुपेरीच्या घाटीत मालवण – बार्शी गाडीला अपघात ; बस १२ फुट दरीत कोसळली

चालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले ; वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत ; नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटणारी मालवण बार्शी एसटी बस कुपेरीची घाटीत कोसळली आहे. येथील तीव्र उताराच्या वळणावर चालत्या बसचे स्टेअरींग लॉक झाल्याने सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात चालकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. रस्त्याच्या खाली १२ फुट कोसळून ही बस दोन वेळा गटांगळ्या खाऊन उभी राहिली. नशीब बलवत्तर म्हणून एवढ्या भिषण अपघाता नंतरही कुणाला मोठी दुखापत झाली नाही. बसचालक श्री. सांगळे यांना उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, मालवण आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण – बार्शी ( एम एच २० – बी एल. २९५८) या बसमध्ये १८ प्रवाशी प्रवास करत होते. बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ही बस रस्त्याच्या बाजुला कोसळत दोन वेळा पलटी होत उभी राहिली. त्यामुळे सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली आहे. वाहक देशमुख व इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले. पहाटे अपघात झाल्याने मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालक तसेच कुणकवळे ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. मालवण आगाराचे व्यावस्थापक आणि कर्मचारी चालक यानीही अपघातस्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!