मालवण तालुका मनसेच्या “राजगड” मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘राजगड’ या मालवण तालुका मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा बुधवार १४ जून सकाळी १० वाजता पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. एसटी स्टॅण्ड समोर प्राईड लॅन्ड इमारत गाळा १४ याठिकाणी हे कार्यालय असणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुक्याच्या वतीने देण्यात आली आहे.

मनसेच्या कार्यालयात न्याय मिळतोच या विश्वासाने मनसे कार्यालयात समस्या सोडवण्यासाठी येतात. याच धर्तीवर मालवण येथील जनतेला हक्काचे कार्यालय असावे या हेतूने ‘राजगड’ जनतेच्या सेवेत असणार आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे प्रश्न कमी अधिक कालावधीत सोडवण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक काम करतील. प्रत्येक समाज घटकाला हे कार्यालय आपल्या हक्काचे वाटेल. यासाठी आम्ही सर्व तत्पर राहू. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुक्याच्या वतीने देण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!