भाजपच्या वतीने आज मालवणात “द केरला स्टोरी” चित्रपटाचे तीन मोफत शो….
भाजप नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांची संकल्पना ; सकाळी ११ वा., दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७ वा. मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर :
भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून आज येथील मामा वरेरकर नाट्यगृहात ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे मोफत ३ शो दाखवण्यात येणार आहेत.
सकाळी ११ वाजता होणाऱ्या शो वेळी उद्घाटक भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती दुपारी ३ वाजता शो वेळी भाजप जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर व भाऊ सामंत यांची प्रमुख उपस्थिती, सायंकाळी ७ वाजता शो वेळी डॉ. सुभाष दिघे व ऍड. समीर गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रत्येक हिंदू आईने आपल्या मुलीसोबत पहावा, प्रत्येक हिंदू बापाने पत्नी व मुलीसोबत पहावा, प्रत्येक हिंदू भावाने लाडक्या बहिणीसोबत पहावा, प्रत्येक हिंदू मुलीने बहिणीसोबत मित्रांनीसोबत आपल्या वर्तमानकाळ व भविष्य काळासाठी पहावा तसेच स्वतःच्या सुरक्षेसाठी व देशाच्या सुद्धा सुरक्षेसाठी पहावा असा हा चित्रपट आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.