प्रशासनाकडून दिरंगाई : पाणी टंचाई निवारणासाठी आ. वैभव नाईक पुढे सरसावले…

कोळंब पाठोपाठ कुंभारमाठला स्वखर्चातून टँकरने पाणी पुरवठा ; ग्रामस्थांतून समाधान

मालवण | कुणाल मांजरेकर

पावसाळा लांबल्याने मालवण तालुक्यातील काही गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पाणी उपलब्ध होईपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी तात्पुरती उपाय योजना म्हणून पाणी टंचाई भेडसावत असलेल्या गावात स्वखर्चातून पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. काल कोळंब गावात पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर आ. वैभव नाईक यांनी कुंभारमाठ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. याबाबत ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठयाची व्यवस्था होईपर्यंत स्वखर्चाने तातडीने नागरिकांची पाण्याची समस्या आ. नाईक यांनी मार्गी लावली आहे. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने पाणी टंचाई भागात पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुंभारमाठ शाखाप्रमुख सदा करंगुटकर यांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी ग्रा. पं.सदस्य राहुल परब, सुवर्णा भोगवकर, तृप्ती लंगोटे, गुडेकर, संजय देऊलकर, मालवण उप शहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवा उप शहरप्रमुख उमेश चव्हाण, अनिल भोगावकर, हेमंत मोंडकर, राजू साळगावकर, दादा पाटकर आदिंसह कुंभारमाठ ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!