खा. संजय राऊत यांच्या पोस्टरला मालवणात शिवसेनेकडून “जोडे मारो”
“त्या” आक्षेपार्ह कृतीचा नोंदवला निषेध
मालवण : महाविकास आघाडीचे ‘थुक सम्राट’ संजय राऊत यांच्या निषेधाचे पोष्टर हाती घेत मालवण तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मालवण भरड नाका येथे जोरदार घोषणाबाजी करत पोष्टरला जोडे मारत निषेध नोंदवला.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे व आमदार संजय शिरसाट यांच्या बाबत उपस्थित प्रश्नांवर वादग्रस्त कृती केली होती. यावरून खा. राऊत यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक बनली आहे. मालवणातही शिवसेनेने ‘जोडेमारो’ कृतीतून संजय राऊत यांचा निषेध नोंदवला. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख राजा गावकर, उपतालुकप्रमुख अरुण तोडणकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, महिला उपजिल्हा संघटक निलम शिंदे, अच्युत लोके, उदय राऊत, नितेश पेडणेकर, कमलेश सारंग, तात्या बांदेकर, भिवा कोळंबकर, नित्यानंद कांबळी, प्रसाद तोडणकर, भारती घारकर, निकिता तोडणकर यासह अन्य उपस्थित होते.