ओरिसा दुर्घटना ; उद्याचे वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण रद्द

नवीन तारीख मागाहून जाहीर होणार

मडगाव | कुणाल मांजरेकर

ओडिसा येथे कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर उद्याचा कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आलेला आहे. या ट्रेनच्या लोकार्पणाचा सुधारित कार्यक्रम मागाहून जाहीर करण्यात येणार आहे.

ओडिसा येथे कोरोमंडल रेल्वेला मालगाडीला धडक बसून अपघात झाला. या अपघातात ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला झाला असून अनेक जण जखमी आहेत आहेत. त्यामुळे वंदे भारत ट्रेनचा लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे या रेल्वेच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द झाले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!