… म्हणून वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळचा थांबा नाही !

भाजपा नेते, माजी खा.निलेश राणे यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ५ जुन पासून नियमितपणे कोकण रेल्वे मार्गावर सुरु होत आहे. ३ जुन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचा शुभारंभ होत आहे. या रेल्वेला सिंधुदुर्गात केवळ कणकवली स्थानकात थांबा देण्यात आला आहे. कुडाळ रेल्वे स्थानकात या रेल्वेला थांबा न मिळाल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ रेल्वे स्थानकात ही रेल्वे न थांबण्याचे कारण दिले आहे.

“माझे काही सहकारी वंदे भारत ट्रेन जी ३ जून पासून कोकणात धावणार आहे, त्या ट्रेनला कुडाळ स्टेशनसाठी थांबा मिळाला नाही याबद्दल निराश झाले. पण आपल्याला मी सांगू इच्छितो मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका महत्त्वाच्या रूट वर ट्रेन सुरू करते, तेव्हा स्टेशनचा ग्रेड तपासते. मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनचं कसलंही अपग्रेडेशनचं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून कणकवली रेल्वे स्टेशन हेच जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणून बघितले जाते.” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

One comment

  1. Kudal laa halt pahije .hya train cha nahi tar Kay fayda evdhya mahagadi railway ticket cha

Leave a Reply

error: Content is protected !!