कोळंब गावात पाणी पातळी खालावली ; ग्रामस्थांची तहसील कार्यालयावर धडक

गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या मालवण तहसीलदारांना सूचना

मालवण : कोळंब गावात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोळंब ग्रामस्थांनी गुरुवारी मालवण तहसील कार्यालयात भेट देऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केलीे. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून कोळंब गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार श्रीम. झालटे यांना दिल्या. मालवण तहसीलदार पदी श्रीम. झालटे यांची नियुक्ती झाल्याने त्यांना आ. वैभव नाईक यांनी शुभेच्छा देत मालवण तालुक्यातील इतर प्रश्नांबाबत चर्चा केली.

याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, नायब तहसीलदार कोकरे, कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, नितीन नेमळेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, सन्मेष परब, हेमंत मोंडकर, दादा पाटकर, दिलीप घारे, सिद्धेश मांजरेकर, बाबू वाघ आदिंसह कोळंब ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!