मालवणात सुवर्णकारांसाठी आयोजित कार्यशाळेला जिल्ह्यातील सुवर्णकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हॉलमार्क दागिने आणि HUID बाबत सविस्तर मार्गदर्शन

मालवण | कुणाल मांजरेकर

दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण आणि मालवण तालुका सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दैवज्ञ भवनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिक, कारागीर वर्गासाठी हॉल मार्क आणि HUID विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून व्यावसायिक या कार्यशाळेला उपस्थित होते.

भारतीय मानक ब्यूरो मुंबई 2 चे विभागीय अधिकारी नरेश हरड यांनी हॉल मार्क विषयी यावेळी विस्तृत मार्गदर्शन केले. तर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे काम विपुल गणेश प्रभुलकर यांनी केले. यावेळी उपस्थित व्यावसायिक बंधूनी हॉल मार्क विषयी उत्तम प्रकारे माहिती घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. डॉ. विवेक रायकर तसेच अनिल मालवणकर यांनी पुढाकार घेऊन ही कार्यशाळा आयोजित केली होती. दैवज्ञ समाज संस्था मालवण तसेच मालवण सराफ असोसिएशन यांनी यासाठी सहकार्य केले. कार्यशाळेचे प्रायोजकत्व सुवर्णकार अनिल मालवणकर यांनी स्वीकारले होते. कार्यशाळा आयोजित करणे तसेच कार्यशाळा नियोजन, निवेदक म्हणून गणेश सखाराम प्रभूलकर यांनी जबाबदारी सांभाळली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!