सिंधुदुर्गवासियांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसला कणकवलीत मिळणार थांबा …

आ. नितेश राणे यांनी दिली माहिती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानले आभार

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

संपूर्ण कोकणाला प्रतीक्षा लागून असलेली वंदे भारत एक्सप्रेस ५ जुन पासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार आहे. सोशल मीडियावरील उलट सुलट चर्चांमुळे वंदे भारत एक्सप्रेस सिंधुदुर्गात थांबा मिळणार का ? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र भाजपा आमदार नितेश राणे यांनी हा संभ्रम दूर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे वंदे भारत एक्सप्रेस ला थांबा देण्यात आला आहे. याबाबत आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया आ. राणे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणवासीय आणि चाकरमान्यांना लागून राहिलेली उत्सुकता अखेर संपली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ३ जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा कंदिल दाखवला जाणार आहे. त्यानंतर ५ जुन पासून ही ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार आहे.

ही ट्रेन सिंधुदुर्गात थांबणार का ? याबाबत उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र आमदार नितेश राणे यांनी या रेल्वेला कणकवली येथे थांबा असणार असल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. सिंधुदुर्ग वासियांसाठी ही गोड बातमी असून या रेल्वेला कणकवली स्थानकावर थांबा दिल्याबद्दल आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आभार मानत असल्याचे आ. राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!