काळसेतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण : तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील (वय- ४५ ) या तरुणाने बुधवारी पहाटे आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वाशास टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

घरातील व्यक्तींच्या सकाळी ही बाब निदर्शनास येताच पोलीस पाटील विनायक प्रभु यांच्याशी संपर्क करत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी पी. जी. मोरे आणि सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. वामन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण येथे आणला आहे. कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेले वामन पाटील हे काही दिवसांपुर्वी काळसे येथील आपल्या घरी आले होते. तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर अधिक तपास करत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!