कुंभारमाठ मधील जलजीवन अंतर्गत नळपाणी योजनेचा भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
कुंभारमाठ गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी ना. राणेंच्या माध्यमातून पाठपुरावा करणार : दत्ता सामंत यांची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
कुंभारमाठ गावातील जलजीवन मिशन योजना अंतर्गत गावासाठी नळपाणी पुरवठा योजना करणे कामाचा शुभारंभ भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्योजक दत्ता सामंत यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, सरपंच सौ. पूनम वाटेगांवकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामसेवक गणेश नलावडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. अनिता गावकर, सौ.आचल गावठे, सौ.प्रिया गोवेकर, प्रमोद भोगावकर, भगवान नेरुरकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मधुकर चव्हाण, ग्रामस्थ मनोज वाटेगावकर, सौ. मानसी भोगावकर, पंढरीनाथ माने, जगदीश शिरोडकर, विनय गावकर, गौरव लुडबे, मंदार लुडबे, गणपत सावंत, रंगराव वडर, महेश पाटील, उदय भोगावकर, सुनील वस्त, सत्यवान गावठे, विलास चव्हाण, राजेश यादव तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. गावात उद्भवणाऱ्या पाणी टंचाई बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून डोंगुर्ला तलावातील गाळ उपसा करून कुंभारमाठ गावासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी दत्ता सामंत यांनी दिली.