Category महाराष्ट्र

विहिरीतील पाईप दुरुस्त करताना बागायतदाराचा बुडून दुर्दैवी मृत्यू

पित्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारलेला मुलगा सुदैवाने बचावला मालवण : शहरातील फोवकांडा पिंपळ येथील रहिवासी व बागायतदार गणेश मारुती आचरेकर यांचा बागेतील विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास कोळंब-कातवड येथे घडली. आपल्या वडिलांना…

मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस रुग्णांची हेळसांड ; नगराध्यक्षांनी घातले लक्ष

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा ; डायलिसीस व इतर आवश्यक सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी आ. निलेश राणे यांचे लक्ष वेधणार मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस मशीनरी व टेक्निशियन पुरेशा प्रमाणात नसल्याने याठिकाणी डायलिसीससाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत असून अनेक रुग्णांना…

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता ; सत्तेच्या माध्यमातून विकासाचे प्रश्न सोडवणार

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना ग्वाही ; मालवणात जि. प, पं. स. सदस्य व नगरसेवकांचा सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा सत्कार सोहळा सोमवारी कोळंब येथील समर्थ…

महाशिवरात्री निमित्त माजी आ. वैभव नाईक यांनी घेतले श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन

देवगड : कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी आज उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ व…

महाशिवरात्री उत्सवानिमित्त तारकर्लीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

मालवण : श्री सदगुरु साई मंदिर, रांजेेश्वर–तारकर्ली येथे १५ फेब्रुवारी व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री उत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री…

महेश इंगळे यांनी प्रथमेश इंगळे व मित्र परिवारासह घेतले कणकवली येथील भालचंद्र महाराजांचे दर्शन

कणकवली : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी कोकण दौर्‍यावर प्रथमेश इंगळे व मित्र परिसरासह कणकवली येथील श्री भालचंद्र महाराज आश्रमास भेट देऊन श्री भालचंद्र महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री भालचंद्र महाराज…

दांडी किनारपट्टीचा सांडपाण्याने भरलेला मार्ग झाला मोकळा

स्थानिक नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांच्या पाठपुराव्यानंतर नगरपालिकेकडून कार्यवाही मालवण : शहरातील दांडी मोरेश्वर येथील किनारपट्टीवर साचलेल्या सांडपाण्यामुळे येथील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला होता. ही बाब येथील स्थानिक शिवसेनेच्या नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ नगरपालिकेकडे लेखी…

महाशिवरात्री रोजी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील दिनक्रमात बदल

प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते रात्री १० वा. पुरोहित मंदार महाराज व ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात लघुरूद्र अभिषेक : महाशिवरात्री रोजी आरती १२ वा. महाआरती अक्कलकोट : सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात रविवार दि.१५ फेब्रुवारी माघ वद्य त्रयोदशी रोजी…

आरोग्य सभापतींची तत्परता ; साईमंदिर परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना

पूनम चव्हाण यांचे धुरीवाडा येथील नागरिकांनी मानले आभार मालवण : शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या आरोग्य व स्वच्छता सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नगरसेविका पूनम चव्हाण यांनी शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील धुरीवाडा साईमंदिर परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा साचलेला कचरा…

मेढा मौनीनाथ मंदिर मार्गावरील गटार बांधकामाची बांधकाम सभापतींकडून पाहणी

मालवण : मालवण शहरातील मेढा मौनीनाथ मंदिर मार्गावरील गटार बांधकामाची पाहाणी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी शुक्रवारी केली. शहरात सुरु असलेली विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. कामावर योग्य पद्धतीने लक्ष ठेवून कामे दर्जेदार करून घ्यावीत. अश्या सूचना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर…

निष्ठेचा सन्मान… !

मालवण नगर परिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर अभिनंदन विशेष कुणाल मांजरेकर ( मालवण) मालवण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ‘शुन्य’ म्हणून हिणवल्या गेलेल्या शिवसेनेने प्रत्यक्ष निकालावेळी आपली ‘जादू’ दाखवत नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या १० जागांवर विजय मिळवत निर्विवाद सत्ता हस्तगत केली. ऐनवेळी तुटलेली…

कोकण हे स्वामी भक्तांचे ‘माहेरघर’ ; महेश इंगळे यांचे गौरवोद्गार 

कोकण दौऱ्यात भाविकांना महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्ती आणि सेवेचा संगम अनुभवला : महेश इंगळे  सिंधुदुर्ग : पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक सारख्या महानगरीय शहरांमध्ये स्वामी भक्तांची लक्षणीय संख्या असली तरी कोकण हे स्वामी…

error: Content is protected !!