Category शिक्षण

हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीच्या घोषणा…

टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची मालवणात प्रेरणादायी तिरंगा रॅली मालवण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागविण्यासाठी मालवण शहरातील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या वतीने शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा, ओठांवर देशभक्तीपर घोषणा आणि मनात…

‘मोबाईलपासून दूर राहा, खेळातून बुद्धिमत्ता वाढवा’ ; कृतीतून संदेश!

भाजप नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांच्याकडून दांडी शाळेला इनडोअर गेम्सची भेट मालवण : भाजप नगरसेविका तथा मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थानिक प्राधिकरण सदस्य सौ. अन्वेषा आचरेकर यांनी दांडी शाळेला विविध प्रकारचे…

डॉ. शिल्पा झाट्ये लिखित कवितेच्या शब्दफुलांनी सजला ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’…!

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन कवितेतून प्रेम, करुणा, संघर्ष आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद मालवण (कुणाल मांजरेकर) येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या लिटरेचर असोसिएशनच्या वतीने डॉ. शिल्पा झांट्ये लिखित ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’ या काव्यसंग्रहाचे…

देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले यशवंतराव भोसले सैनिक स्कूल!

‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सवा’त विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उत्स्फूर्त दाद ; समूह नृत्य व समूहगीत स्पर्धेत चमकदार कामगिरी सावंतवाडी : ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव २०२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत २८२ शिक्षक पदांची भरती

पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया; १३ ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : पवित्र प्रणालीमार्फत सन 2025-26 साठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे…

भोसले सैनिक स्कूलचा पुण्यात डंका ; ठरले ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’!

पुणे येथील १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्हमध्ये पुरस्कार प्रदान ; ५०० हून अधिक नामांकनांमधून शाळेची पुरस्कारासाठी निवड सावंतवाडी : पुणे येथे झालेल्या १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलला ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’ पुरस्काराने सन्मानित…

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे विश्वस्त विनोद कदम यांचे निधन

मालवण : येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाडचे विश्वस्त विनोद बाबू कदम ( वय सुमारे ६५) यांचे आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले असून त्याच ठिकाणी सोमवारी सकाळी…

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ८ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव

३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी करणार सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

डीएड कॉलेज मालवण येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मालवण : डीएड कॉलेज मालवण येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी डीएड कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा. रमेश वळवी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. नितीन राणे, बार्टीचे…

भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे मुंबई विद्यापीठाची ‘आविष्कार-२०२६’ संशोधन अधिवेशन कार्यशाळा

१ व २ ऑगस्ट रोजी आयोजन : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधन समन्वयक आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या २१ व्या ‘आविष्कार’ संशोधन अधिवेशन २०२६–२७ अनुषंगाने यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी…

एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. विशाल कुशे यांना पीएचडी प्रदान

एमिटी मुंबई विद्यापीठाकडून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी मालवण : सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. विशाल प्रमोद कुशे यांना नुकतीच एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई या विद्यापीठाकडून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली.…

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ्रा देसाईला जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक, विभागीय स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शुभ्राने विभागीय स्तरावरील ज्युदो अजिंक्यपद…

error: Content is protected !!